Ravet : सून आणि तिच्या आईच्या त्रासाला कंटाळून वृद्ध दांपत्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सून आणि तिच्या आईच्या त्रासाला (Ravet) कंटाळून वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली. ही घटना 27 ऑक्‍टोबर 2022 रोजी रावेत येथे घडली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद मेसी (वय 68) आणि त्यांची पत्नी (वय 62, दोघेही रा. वास्तू रिव्हर, नेक्‍स सोसायटी, रावेत) अशी आत्महत्या केलेल्या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसी यांची सून आणि तिच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मेसी आणि त्यांच्या पत्नीने 27 ऑक्‍टोबर 2022 रोजी राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी शरद मेसी यांच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपली सून आणि तिची आई यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.

Dighi : दिघी कन्या शाळेमध्ये माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन

दरम्यान पोलिसांनी मुलाला सुसाइड नोट (Ravet) दाखविली. मात्र असे काही घडले नाही, असे म्हणत मुलाने फिर्याद देण्यास नकार दिला. तर मुलीनेही आपण मुंबईला राहत असल्याचे सांगत या प्रकाराबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत तिनेही फिर्याद देण्यास नकार दिला.

मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे अखेर सरकारच्यावतीने दहा महिन्यांनी पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक परवेश शिकलगार तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.