Dighi : दिघी कन्या शाळेमध्ये माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : दिघी कन्या शाळेमध्ये (Dighi) शुक्रवारी (दि 11) माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझी माती, माझा देश!’ हे अभियान देशभर राबविले जात आहे. याच अभियाना अंतर्गत माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी सैनिक कॅप्टन पदमसिंग सिकरवार आणि कॅप्टन विजय निकम हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण गोडसे व इतर सदस्य, शिक्षक आणि विद्यार्थीही होते.

या सर्वांच्या उपस्थितीत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कॅप्टन सिकरवार आणि कॅप्टन निकम यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे सीमेवरील अनुभव, सैनिकांचे खडतर जीवन, याबाबत रोमांचक माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले.

Pimple Nilakh : बनावट कागदपत्रांच्या आधारे कारचा अपहार

मुख्याध्यापिका सुनंदा शिंदे यांच्या (Dighi) मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विलास साबळे आणि सुलभा जगताप यांनी विद्यार्थ्यांना सैनिकांना बाबत माहिती सांगितली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिळा बाबर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.