Dighi : आर्मी इन्स्टिट्यूट आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात 7 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज : मनमोहक नृत्यासह कलागुणांचे (Dighi) सादरीकरण, जिंकण्याच्या वृत्तीने केलेला खेळ आणि इनोव्हेशन, तंत्रज्ञानाच्या अविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे, उत्साहाचे दर्शन घडवले. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) आयोजिलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा-सांस्कृतिक व तंत्रज्ञान महोत्सवाचे!

दिघी येथील ‘एआयटी’च्या कॅम्पसमध्ये नुकत्याच आयोजित ‘पेस-2023’ (क्रीडा), ‘अमेथिस्ट 2023’ (सांस्कृतिक) आणि ‘सोल्युशन्स 2023’ (तंत्रज्ञान) महोत्सवात राज्यभरातून विविध महाविद्यालयांचे संघ यामध्ये सहभागी झाले.

‘एआयटी’च्या स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पेस 2023’ क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धांत एकूण 178 संघ, 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी भारतीय रोइंगपटू, अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार बजरंग लाल ठक्कर उद्घाटनाला, तर आशियाई पदक विजेता सुभेदार मेजर सतीश कुमार आणि अरोकिया राजीव समारोपाला प्रमुख अतिथी होते. ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडीयर (नि.) अभय भट, सहसंचालक कर्नल (नि.) मनोज कुमार प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

एआयटी पुणे (क्रिकेट-मुले), जेएसपीएम ताथवडे (कबड्डी), व्हीआयटी पुणे (बॅडमिंटन-मुले व मिश्र), एएफएमसी पुणे (बॅडमिंटन-मुली), एआयटी पुणे (व्हॉलीबॉल-मुले), एएफएमसी पुणे (व्हॉलीबॉल-मुली), एआयटी पुणे (बास्केटबॉल-मुले), एमआयटी डब्ल्यूपीयू पुणे (बास्केटबॉल-मुली), ख्रिस्त कॉलेज पुणे (फुटबॉल-मुले), एआयटी पुणे (फूटबॉल-मुले), सिम्बायोसिस स्कुल ऑफ लिबरल आर्टस् (फुटबॉल-मुली, सीएमई पुणे (स्क्वॅश-मुले-एकेरी), युपी स्क्वॅश (स्क्वॅश-मुले -सांघिक), एआयटी पुणे (लॉन टेनिस-मुले), कमिन्स पुणे (लॉन टेनिस-मुली), डी. वाय. पाटील विद्यापीठ (टेबल टेनिस-मुली-एकेरी), फ्लेम युनिव्हर्सिटी (टेबल टेनिस-मुले एकेरी व सांघिक), एमएमसीसी पुणे (बुद्धिबळ-मुली), एएफएमसी पुणे (बुद्धिबळ-मुले) या संघानी विजय मिळवला.

‘सोल्युशन्स 2023’मध्ये आयआयटी, एनआयटी यांसारख्या (Dighi) नामांकित इन्स्टिट्यूट्ससह भारतातील विविध महाविद्यालयांतून 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कोडिंग, गेमिंग, रोबोटिक्स अशा ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात विविध २० प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मायक्रोसॉफ्ट इंजिनीअर कुशल विजय यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आकर्षण राहिले. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य लावत तंत्रज्ञानाचे अद्भुत अविष्कार दाखवले.

Alandi : माऊलींच्या नगरीत प्रथमच दृष्टीहीन बांधव करणार पारायण

कोरोनाच्या निर्बंधानंतर दोन वर्षांनी ‘अमेथिस्ट 2023’ हा सांस्कृतिक महोत्सव ‘एआयटी’मध्ये झाला. नृत्य, गायन, बॅटल ऑफ बाँड्स, जॅम, वादविवाद, नाट्य, प्रश्नमंजुषा अशा 15 स्पर्धा झाल्या. ‘हानामी’ या जापनीज परंपरेवर आधारित हा महोत्सव होता. भोपाळ येथील ऍप्रिकॉट बँडचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि डीजे नाईट यंदाच्या ‘अमेथिस्ट’चे आकर्षण होते. गायिका स्मृती ठाकूर व संगीतकार मोहित सोळंकी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. ‘एआयटी’सह एसआयबीएम, फर्ग्युसन कॉलेज, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, एआयएसएसएमएस, सिम्बायोसिस आदी महाविद्यालयांतून 70 संघ यामध्ये सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.