Alandi : माऊलींच्या नगरीत प्रथमच दृष्टीहीन बांधव करणार पारायण

एमपीसी न्यूज : माऊलींच्या नगरीत प्रथमच दृष्टीहीन (Alandi) बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले आहे. हे पारायण ‘द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनाइजेशन इंडिया’, नाशिक व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.

Pimpri : शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारावी – महेश लांडगे

हे ज्ञानेश्वरी पारायण भक्त निवास येथे (संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Alandi) मंदिरा जवळ) 5 मे ते 7 मे या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक ‘द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनाइजेशन इंडिया, नाशिक’चे अरुण भारस्कर व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगेश देसाई हे आहेत. देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी याबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.