Pimpri : शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारावी – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Pimpri) वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी व शहराचा वैचारिक विकास व्हावा, यादृष्टीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आगामी काळात पिंपरी-चिंचवडची ओळख ‘नॉलेज सिटी’ अशी व्हावी, असा आमचा संकल्प आहे. त्यासाठी राज्य-परराज्यातील नामांकीत शिक्षण संस्थांच्या शाखा शहरात सुरू व्हाव्यात. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण धोरणात्मक निर्णय घेत आहात, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. महापालिका प्रशासानाच्या प्रयत्नातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ललित कला अकादमी यासारख्या मोठ्या संस्थांच्या शाखा शहरात  (Pimpri) सुरू होत आहेत.

Gautami Patil : गौतमी पाटील MMS प्रकरणी मोठी बातमी; एकाला अहमदनगरमधून घेतले ताब्यात

शहरात देशातील कानाकोपऱ्यातून लोक व्यावसाय, नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे विविध भाषिक नागरिकांचा विचार करून मराठी व इंग्रजी भाषेप्रमाणेच विविध भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध उपलब्ध असलेले अध्यायावत ग्रंथालय ही या शहराची गरज आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.