Gautami Patil : गौतमी पाटील MMS प्रकरणी मोठी बातमी; एकाला अहमदनगरमधून घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : गौतमी पाटील MMS प्रकरणी पुणे (Gautami Patil) पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता. व्हिडिओ कोणी काढला याचा शोध पोलिसांनी सुरु केला असता अखेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Savarkar : सावरकरांचे विचार समाजात पोहोचवणे आवश्यक – योगेश सोमण

तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. या तरुणासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचेही तपासात समोर आले आहे. Instagram वर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी हा प्रताप केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची (Gautami Patil) दखल घेतली होती. तर गौतमीच्या एका सहकारीने पुण्यात तक्रार दाखल केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.