Bhosari : किरकोळ कारणावरून टोळक्यात मारामारी

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून (Bhosari ) तिघांमध्ये बेदम मारामारी झाली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.30) रात्री भोसरी येथे घडला.

याप्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी भास्कर फुंदे यांनी मंगळवारी (दि.2) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमर रमेश डोळस (वय 24, रा.दिघीरोड), यश मोहन निकम (वय 19, रा.भोसरी), राहूल चंद्रकांत मोरे (वय 48, रा.भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Dighi : आर्मी इन्स्टिट्यूट आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात 7 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून आरोपी हे आपापसात भांडत एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. यामुळे परिसरात गर्दी जमली होती. यामुळे सार्वजनिक (Bhosari) शांततेचा भंग होत असल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.