Pimple Nilakh : बनावट कागदपत्रांच्या आधारे कारचा अपहार

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे झूम कार कंपनीकडे (Pimple Nilakh) सादर करून दुसऱ्याच्या मालकीची कार आपल्या मालकीची असल्याचे दाखवून अपहार केला. ही घटना 18 जून रोजी पिंपळे निलख येथे घडली.

गोरखनाथ राजाराम मोरे (वय 37, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नुरुल हक जे चौहाण उर्फ सुफीयन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : संत निरंकारी मिशन करणार ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश परदेशी यांच्या पत्नीच्या मालकीची कार (एमएच 14/जेएम 1932) त्यांनी झूम कार कंपनीला भाडेतत्वावर दिली आहे. आरोपीने गणपत लाल खटिक (रा. राजस्थान) याच्या मालकीची असल्याची बनावट कागदपत्रे झूम कार कंपनीकडे सादर करून कंपनीकडे 21 हजार 499 रुपये आगाऊ रक्कम भरून कंपनीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने नितेश परदेशी यांच्या पत्नीच्या मालकीची कार घेऊन जात तिचा अपहर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.