Rajgurunagar Sahakari Bank : राजगुरूनगर बँकेचे नवनिर्वाचित संचालक रामदास धनवटे यांचा आळंदीमध्ये सत्कार

एमपीसी न्यूज : राजगुरूनगर सहकारी बँकेची (Rajgurunagar Sahakari Bank) निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलकडून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी विजय संपादन केले. दि.11 नोव्हेंबर रोजी त्यांनी माऊलींच्या आशिर्वादासाठी आळंदी येथील माऊली मंदिरात श्रींच्या चल पादुकांवर अभिषेक केला. तसेच संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

Sharad Pawar Cancer : अजित पवार यांनी सांगितला शरद पवार यांचा कॅन्सरचा प्रेरणादायी प्रवास

यावेळी आळंदी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख अविनाश तापकीर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची मुर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गटाचे) पदाधिकारी आनंदराव मुंगसे, अनिताताई झुजम, शशीराजे जाधव, राहुल सोमवंशी, विश्वनाथ नेटके, संदीप पगडे आदी मान्यवर उपस्थित होते. व हराळै वैष्णव धर्मशाळेमध्ये माऊलींची मूर्ती, श्रीफळ, वारकरी उपरणे देत त्यांचा सन्मान हराळै वैष्णव विश्वस्त तुषार नेटके यांनी केला.

यावेळी मनसे पदाधिकारी प्रसाद बोराटे, अजय तापकीर व संकेत वाघमारे इ. नागरिक उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त धर्मशाळेत सप्ताहाचे (Rajgurunagar Sahakari Bank) आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण यावेळी त्यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.