Sharad Pawar Cancer : अजित पवार यांनी सांगितला शरद पवार यांचा कॅन्सरचा प्रेरणादायी प्रवास

एमपीसी न्यूज : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि काॅन्व्हलसंट होम यांचा संयुक्त उपक्रम म्हणून नव्यानेच सुरू झालेल्या कॅन्सर सेंटरचे उद्घाटन केले. यावर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कॅन्सरचा प्रेरणादायी किस्सा सांगितला.

अजित पवार यांनी सांगितले, की ज्यावेळी शरद पवार (Sharad Pawar Cancer) यांना कॅन्सरचे निदान झाले त्यावेळी त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एक-एक क्षण त्यावेळी महत्त्वाचा होता. कारण आधीच उशीर झाला होता त्यामुळे आजार वाढणार होता. त्यावेळी सर्वच घाबरले होते. पवारांचे ऑपरेशन पार पडल्यावर डॉक्टरांनी पवार यांना प्रश्न केला, की पवार तुमचं आयुष्य किती आहे, हे सांगू का? त्यावर त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले माहीत नाही. परंतु, शरद पवार म्हणाले, की मी तुम्हाला पोहोचवल्यावर मी जाणार आहे. कॅन्सर झाल्यावर खचून जाऊ नका असे नेहमीच शरद पवार म्हणतात. त्यांनी या आजारातून फार काही खंबीरपणे सहन केले, ते डगमगले नाहीत.

Ajit Pawar : तळेगाव दाभाडे हे मेडिकल हब व्हावे – अजित पवार

माजी गृहमंत्री आर आर आबा यांना ज्यावेळी कॅन्सर झाला, त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar Cancer) यांनी फोन करून आबांचे सांत्वन केले, आणि म्हंटले की खचून जाऊ नका. घाबरू नका. परंतु, आबा घाबरले आणि खचले आणि आपण मोठा नेता गमावला. असे अजित पवार यांनी वक्तव्य केले. कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना शरद पवार यांच्या या लढयातून प्रेरणा घेणारा प्रसंग अजित पवार यांनी सांगितला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.