Ravet : सेंट्रींग साहित्य चोरून नेताना चोरटा रंगेहाथ पकडला

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर ठेवलेले सेंट्रींग साहित्य (Ravet) चोरून नेत असताना एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना 7 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजता चंद्रभागा कॉर्नर, रावेत येथे घडली.

Dehu Road : मामुर्डीमधील गणेश मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

रोहित उर्फ बुधाजी बालाजी जाधव (वय 18, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक अर्जुन नलवडे (वय 30, रा. चिखली) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बांधकाम साईटवर सेंट्रींग साहित्य ठेवले होते. त्यातील दहा हजारांचे लोखंडी जॅक मुंडे आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी रोहित जाधव याला चोरी करताना रंगेहाथ पकडले. मात्र त्याचा साथीदार गाडी घेऊन पळून गेला. रावेत पोलीस (Ravet) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.