Dehu Road : मामुर्डीमधील गणेश मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

एमपीसी न्यूज – मामुर्डी येथील गणेश मंदिरातील (Dehu Road) दानपेटी फोडून त्यातून सुमारे 10 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 7) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.

अमोल दत्तात्रय राउत (वय 40, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : हॉस्पिटलमधील मावशीने रुग्णाची सोनसाखळी चोरली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी येथे नवरंग सोसायटीमध्ये जय गणेश चॅरीटेबल ट्रस्टचे गणेश मंदिर आहे. फिर्यादी यांच्या वडिलांनी रविवारी रात्री मंदिर कुलूप लाऊन बंद केले.

रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी ग्रीलला तसेच गाभा-याला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातून सुमारे दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून (Dehu Road) नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.