Wakad : हॉस्पिटलमधील मावशीने रुग्णाची सोनसाखळी चोरली

एमपीसी न्यूज –  काळेवाडी फाटा येथील एन आर एस हॉस्पिटलमध्ये (Wakad) मावशी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने रुग्णाच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरली. ही घटना 30 जून रोजी सायंकाळी घडली.

Khed : कोयाळी येथे सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

शिवकुमार उमाकांत चाकोते (वय 42, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मावशी म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काळेवाडी फाटा येथे एनआरएस हॉस्पिटल आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोपी महिला मदतनीस (मावशी) म्हणून काम करते.

तिने हॉस्पिटलमधील एक्सरे काढण्यासाठी रुग्णांना नेल्यानंतर एका रुग्णाच्या गळ्यातील 24 ग्राम वजनाची एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरली. वाकड पोलीस तपास करीत (Wakad) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.