Khed : कोयाळी येथे सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज –  खेड तालुक्यातील ( Khed) कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारला. यामध्ये सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 7) दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली.

Pimpri : श्री कालभैरवनाथ कथा व किर्तन सोहळ्याची सांगता

पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दारूभट्टी लावणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने कोयाळी गावातील कंजारभाट वस्ती येथे असलेल्या ओढ्याच्या बाजूला दारूभट्टी लावली.

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. दरम्यान आरोपी महिला पोलिसांना पाहून पळून गेली. आळंदी पोलीस तपास करीत ( Khed) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.