Pimpri : श्री कालभैरवनाथ कथा व किर्तन सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज – पिंपरीगावामध्ये माजी नगरसेवक संदीप वाघरे यांच्यावतीने आयोजित श्री काळभैरवनाथ कथा व किर्तन सोहळ्याची सांगता ( Pimpri ) झाली.

श्री काळभैरवनाथ मंदिर येथे  कै. सुमनताई बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन  करण्यात आले होते. कथेचे निरुपण संगिताई येणपुरे -चोपडे यांच्या वतीने करण्यात आले. कै. सविताताई सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ  कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यामध्ये ह.भ.प. संतोष महाराज काळोखे (देहू), ह.भ.प.एकनाथ महाराजवाडीकर(पाली), ह.भ.प.विकास महाराज झिरपे (नगर),  ह.भ.प.महादेव महाराजभुजबळ (वाकड) यांचा  किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.

Pune : रविकांत तुपकर यांनी 15 ऑगस्टपर्यंत शिस्त पालन समितीसमोर म्हणणे मांडावे

पंचक्रोशीतून आलेल्या भाविकासाठी  वाघेरे यांच्यावतीने  सुमारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.   वाघेरे म्हणाले की, पिंपरीगावातील श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार  केल्यानंतर मंदिराची महती केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात  व्हावी. यासाठी झी टॉकीज व संदिप वाघेरे युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  झी टॉकीज या वाहीनीवर 12 ऑगस्ट पासून प्रक्षेपीत  केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वाघेरे,  भाऊसाहेब राक्षे, गणेशभाऊ मंजाळ ,रंजनाताई जाधव, श्रीकांत वाघरे, सचिन वाघरे, विजय जाचक यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास वायसीएम रुग्णालयाचे  डॉ. विनायक पाटील,वस्ताद दत्तोबा नाणेकर, जयवंत शिंदे, हनुमंत वाघेरे, अंकुश वाघेरे रामभाऊ कुदळे आदी ( Pimpri ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.