Pune : रविकांत तुपकर यांनी 15 ऑगस्टपर्यंत शिस्त पालन समितीसमोर म्हणणे मांडावे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पक्ष नेतृत्वाच्या (Pune)  कार्यपद्धतीवर आणि भूमिकेबद्दल आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तपालन समितीची बैठक झाली.  या बैठकीला रविकांत तुपकर यांनी हे अनुपस्थित होते . त्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट पर्यंत रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समिती समोर आपले म्हणणे मांडावे,अन्यथा समिती मार्फत निर्णय घेतला जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

PCMC : रस्ते दुरूस्तीसाठी प्रभाग निहाय विशेष पथकांची नेमणूक

या बैठकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिस्तपालन समितीची बैठक झाली. ही बैठक जवळपास दीड तास चालली आहे. या बैठकीबाबत रविकांत तुपकर यांना कळविण्यात आले होते.

मात्र ते काही आले नाही, तरी देखील आजची बैठक झाली आहे. तसेच रविकांत तुपकर यांनी माझ्यावरच आरोप केले आहे. त्यामुळे मी आरोपीच्या पिंजर्‍यात आहे. यामुळे मी रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय घेणार नसून शिस्त पालन समिती निर्णय घेणार आहे.

मात्र आज रविकांत तुपकर बैठकीसाठी आले नाही. त्यामुळे शिस्त पालन समितीने रविकांत तुपकर यांना 15 ऑगस्ट पर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील निर्णय समितीमार्फत घेतला जाणार (Pune)  असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.