Ravindra Berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे ( Ravindra Berde) यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Fursungi : गाडी घासली या किरकोळ कारणावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

रवींद्र बेर्डे यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांची अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी हिट ठरली होती.रवींद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ आणि नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू होते. धडाकेबाज, चंगू मंगू, माझा छकुला अशा अनेक सिनेमांमध्ये रवींद्र – लक्ष्मीकांत जोडीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली.

अगदी तरुण वयात ते नभोवाणीशी जोडले गेले. 1965 पासून आकाशवाणीवर नभोनाटयांचे दिग्दर्शन करता करता त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. 1987 साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर 31 नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. त्यांनी चित्रपटात खलनायकी आणि  विनोदी अशा दोन्ही  व्यक्तिरेखा  ( Ravindra Berde) साकारल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.