Ravindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार 

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी ( Ravindra Mahajani ) यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युत दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी,मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.

Pimpri :  महानगरपालिकेच्या ब क्षेत्रिय कार्यालयांतर्गत शहरात दोन ठिकाणी वृक्षारोपण

ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच तळेगाव येथील राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

साधारणपणे तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

त्या घटनेची माहिती रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर याला मिळताच तो  मुंबईहून तळेगाव दाभाडेला आला.

तर या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला.

त्यानंतर सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यावेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयांसह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी ( Ravindra Mahajani ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.