Fursungi : गाडी घासली या किरकोळ कारणावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – गाडी घासली या किरकोळ कारणावरून दहा ते अकरा जणांनी (Fursungi) शस्त्राने वार करत व दगडाने ठेचून एकाचा खून केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) मध्यरात्री फुरसुंगी ते चंदवाडी रोड फुरसुंगी येथे घडला आहे.

अभिषेक संजय भोसले (वय 30 , रा -शेवाळवाडी मांजरी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अथर्व दादासाहेब साबळे  (वय 18 रा -शेवाळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट,  सचिन सकट रा – चंदवाडी फुरसुंगी व इतर 7-8 अनोळखी इसम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CBSE Exam : सीबीएसई कडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हे फिर्यादीचे मामा असून मामा यांची स्विफ्ट गाडी घासल्याच्या कारणावरून आरोपी – विलास सकट यांच्याशी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून, यातील आरोपी – विलास सकट, कैलास सकट, सचिन सकट व इतर 7-8  इसमानी संगनमत करून शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच लोखंडी धारदार शस्त्र व दगडाने जबर मारहाण करून भोसले यांना जीवे ठार मारले व तसेच फिर्यादी अडवायला गेला असता त्याला सुद्धा दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे. यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Fursungi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.