PMPML : संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त पीएपीएमएलने 76 लाख प्रवाश्यांनी केला प्रवास, पीएमपीएलने 6 दिवसात कमावले साडे दहा कोटी

एमपीसी न्यूज –  कार्तिकी एकादशी व संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ( PMPML ) पीएमपीएमएल तर्फे जादा बसेस सोडण्यात आले होत्या. पीएमपीएमएल बसने 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत 76 लाख 92 हजार प्रवाश्यांनी प्रवास केला असून यातून पीएमपीएमएलने तब्बल साडे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

Ravindra Berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

पीएमपीएमएलने जाहीर केलेल्या आकडेवारूनुसार 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत आळंदी व देहु साठी तब्ब्ल 10 हजार 621 एवढ्या बसच्या फेऱ्या झाल्या आहेत म्हणजे दिवसाला एकूण 1 हजार 770 फेऱ्या झाल्या आहेत.

ज्यामध्ये दिवसाकाठी 12 लाख 77 हजार 55 प्रवाशांनी प्रवास केला आहे . ज्यातून दिवसाला पीएमीपीएमएल ने तिकीट व पास विक्रीतून 1 कोटी 75 लाख 87 हजार 918 रुपये कामवले आहे. तर एकूण यात्रा काळात तब्बल 10 कोटी 55 लाख 27 हजार 505 रुपये कमावले आहेत.

हे उत्पन्न 2022 सालच्या संजिवन समाधी सोहळ्याच्या तुलनेत जास्त असून त्यात एक ते दीड कोटींनी वाढ झाली आहे. त्या तुलनेने प्रवाशी संख्या देखील 2022 साली 67 लाख 54 हजार 159 एवढी होती ती वाढून 76 लाख 62 हजार 331 एवढी म्हणजे दहा लाखांनी वाढली आहे.

प्रवाश्यांनी पीएमपीएमएल पसंती दिली असून पीएमपीएमएल तर्फे दिलेल्या दैनंदिन पास व रात्री उशीरा पर्यंत पुरवलेल्या बस सेवेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला ( PMPML ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.