Brand India: ब्रँड इंडिया उभारणीसाठी मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी घेतली गोलमेज परिषद

एमपीसी न्यूज : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी ब्रँड इंडिया (Brand India)/उभारणीसाठी आज देशाच्या परराष्ट्र व्यवहार सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, नवी दिल्लीत विज्ञान भवनात गोलमेज परिषद घेतली.

भारताच्या आरोग्यविषयक उच्च परिसंस्था आणि जागतिक तोडीच्या आरोग्य सुविधांमुळे भारत संपूर्ण जगाचे लक्ष वेधत असल्याचे मांडवीया यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले. आज जगातल्या विविध देशांमधले लोक मोठ्या संख्येने भारतात उपचार घेण्यासाठी येत आहेत. वैद्यकीय पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकारने, भारतात उपचार घेऊन बरे व्हा यासाठीचा ‘हिल इन इंडिया’ (Brand India)/कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केला आहे.

त्याचप्रमाणे ‘हिल बाय इंडिया’ कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आपल्या वैद्यकीय मनुष्यबळाला संपूर्ण जगभरात प्रवासाची संधी प्राप्त होऊन आरोग्यवान जगासाठी योगदानही साध्य होईल असे मांडवीया यांनी सांगितले. ‘हिल इन इंडिया अँन्ड हिल बाय इंडिया’ उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि आपल्या पारंपरिक औषध उद्योगाला अधिक बळकटी देत भारताला वैद्यकीयदृष्ट्या जागतिक मूल्य केंद्र करण्यासाठी कटिबद्ध असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ग्वाही दिली.

Brand India

वैद्यकीय मूल्य पर्यटन अधिक मजबूत करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज अधोरेखित करतानाच जगभरातून भारतात उपचारासाठी येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींकरिता, जगभरातल्या भारतीय दुतावासात सुविधा केंद्र उभारण्याचे त्यांनी सुचवले. याच बरोबर भारतात उपचार घेतलेल्या लोकांकडून प्रतिसाद/प्रशंसा प्राप्त करण्यासाठी प्रणाली बसवता येईल. यामुळे वैद्यकीय पर्यटन ‘ब्रँड इंडिया’ (Brand India) करण्यासाठी आपल्याला मदत होईल. परदेशातून भारतात उपचारासाठी येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या सोयीसाठी आणि त्यांना विश्वासार्ह माहिती सुलभपणे मिळावी यासाठी ‘वन स्टेप’ पोर्टल तयार करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.