Pune News : वाहनतळ ठेकेदारांकडे 5.65 कोटीची थकबाकी

एमपीसी न्यूज – महापालिकेची वाहनतळे चालविण्यास दिलेल्या विविध ठेकेदारांकडे तब्बल 5 कोटी 65 लाख 79 हजार 756 रुपये थकबाकी असून ही थकबाकी वसुलीसाठी संबंधीत ठेकेदाराच्या मिळकतींवर बोजा चढवण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

नागरिकांच्या सोयींसाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 30 वाहनतळे उभारली आहेत. ही वाहनतळे निविदा काढून खासगी ठेकेदारांना चालवण्यासाठी दिली जातात. मात्र, अनेक ठेकेदार वहानचालकांकडून पैसे घेऊनही महापालिकेकडे भाडे जमा करत नाहीत तसेच अनेक ठेकेदार निविदेचा कालावधी संपूनही ताबा न सोडता वाहनतळे वापरत आहेत.

महापालिकेच्या प्रकल्प अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध ठेकेदारांकडे तब्बल 79 हजार 756 रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल होण्यासाठी संबंधीत ठेकेदाराच्या मिळकतीवर बोजा चढवण्यात येत आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास मालमत्त जप्तीसाठी न्यायालयात दावे दाखल केले जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सर्व वाहनतळे ताब्यात घेतले आहेत. यातील सतीशशेठ मिसाळ वाहनतळ, हमालवाडा वाहनतळे चारचाकी आमि दुचाकी, आर्यन वाहनतळ आणि तुकारामशेठ शिंदे वाहनतळ (दुचाकी) ही वाहनतळे प्रशासनाकडून चालवण्यात येत आहेत. तर झोन क मधील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय वाहनतळ, कात्रज जुना जकातनाका वाहनतळ, कात्रज डेअरीजवळील वाहनतळ, पु. लं. देशपांडे उद्यानाजवळील वाहनतळ, कोंढवा बु. येथील इस्कॉन मंदिराजवळील वाहनतळ, सातारा रस्त्यावरील साईबाबा मंदिराजवळील वाहनतळ, बिबवेवाडी येथील डिसिजन टॉवर वाहनतळ, धनकवडी येथील ट्रकटर्मिनल वाहनतळ, पेशवे पार्क येथील वाहनतळ, शुक्रवार पेठेतील नवलोबा वाहनतळ ही दहा वाहनतळे एकाच ठेकेदाराने चालविण्यास घेतली आहेत.

काही वाहनताळ बंद ठेवण्यात आली आहेत, तर काही ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन वाहनतळांसाठी प्रत्यकी 1 निवीदा आल्याने त्या रद्द करून फेरनिवीदा काढण्यात येणार आहे. दोन वाहनताळांसाठी निविदा प्रक्रीया सुरू असून पुढाल आठवड्यात चार वाहनतळांसाठी निविदा प्रक्रीया राबविली जाणार असल्याचे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.