Pune News : पीओपीच्या मूर्ती तयार कराल तर खबरदार, महापालिकेचा इशारा 

एमपीसी न्यूज – केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या आदेशानुसार आता पीओपीच्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व मुर्ती उत्पादकांनी पीओपीच्या मुर्ती तयार करु नयेत, असे आदेश महापलिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत, अशी माहिती पर्यावरण विभागाचे  प्रमुख यशवंत माने यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून पीओपीच्या मुर्तींवर बंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील मूर्ती उत्पादक कारागीर, कामगार व इतर सर्व संबंधितांना यापुढे पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली असल्याचे कळवण्यात येत  आहे. शहरात कोणत्याही मूर्ती उत्पादनाकांनी पीओपीच्या मुर्तीचे उत्पादन करु नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे,  असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

 

महापालिका प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबावणी तत्काळ करण्यात येणार आहे. मूर्ती उत्पादक, कारागीर,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेशमुर्ती बाबत आता जनजागृतीसुध्दा करण्यात येणार  आहे. सर्वांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.