Yoga Camp : अमरावतीकरांसाठी उद्या एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (Yoga Camp) म्हणून साजरा केला जातो.

यावर्षीच्या 8 व्या योग दिनानिमित्त आणि आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये योग अभ्यासाचे सराव करण्यात येणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून अमरावती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, यशोदा जान्हवी बहुदेशीय संस्था आणि सूर्योदय योग अनुसंधान केंद्र, श्याम नगर, अमरावती यांच्या सयुंक्त विद्यामाने 13 मे 2022 रोजी सकाळी 5.45 ते 07.00 पर्यंत अग्रवाल योग भवन, श्याम नगर, अमरावती येथे एक दिवसीय योग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय योग (Yoga Camp) अभ्यासामध्ये योग प्रशिक्षक नितिन बोबडे यांच्याकडून सूर्य नमस्कार, योगासने आणि सामान्य योग प्रोटोकॉलचे सराव करून घेण्यात येणार आहे. तरी सर्व अमरावतीकरांनी या योग अभ्यासामध्ये मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.