Pune : पुण्यात 22 जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाची माहिती

एमपीसी न्यूज – पुण्यात 22 जानेवारीला (Pune) प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदू खाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करणार आहेत. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. आपले सर्व मटण विक्री व्यवहार बंद करून या पवित्र कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र हिंदू खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Pune : खेळण्याच्या नादात मेट्रो ट्रॅकवर पडला मुलगा; सुरक्षा रक्षकामुळे बचावले प्राण

दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, या (Pune) दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 4 जानेवारी रोजी केली होती.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.