Pune : खेळण्याच्या नादात मेट्रो ट्रॅकवर पडला मुलगा; सुरक्षा रक्षकामुळे बचावले प्राण

एमपीसी न्यूज – मेट्रो स्थानकावर खेळत असलेला तीन वर्षांचा लहान मुलगा रुळावर पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याची आई गेली असता ती देखील रुळावर पडली. मात्र मेट्रोस्थानकावरील सुरक्षारक्षकाच्या समय सूचकतेमुळे दोघांचेही प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी दिनांक 19 दुपारी 2.22 वाजता घडली.

सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक दोनवर खेळत असलेला तीन वर्षांचा मुलगा रुळावर पडला. मुलगा रुळावर पडल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्याची आई गेली मात्र ती देखील रुळावर पडली हा संपूर्ण प्रकार मेट्रोस्थानकावर नेमणुकीस असलेले सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी पाहिला.

Nigdi : निगडीतील बैठ्या पक्क्या घरांच्या ‘एसआरए’ अंतर्गत पुनर्वसनास स्थानिक नगरसेवकांचा विरोध

बांगर यांनी तत्काळ धाव घेत फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन दाबले. त्यावेळी मेट्रो स्थानकाच्या दोन्ही बाजूने मेट्रो ट्रेन येत होत्या. प्लंजर बटन वेळीच दाबल्याने स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या. यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ 30 मीटर होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूपपणे रुळावरून बाहेर काढण्यात आले.

सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.