Hadapsar : समृद्धी आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील सेक्स रॅकेट उघडकीस; 3 मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका 

एमपीसी न्यूज : हडपसर येथील समृद्धी  आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरवर छापा टाकून पोलीसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणून  3 सज्ञान मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली तर वेश्याव्यवसाय करण्यास लावणा-या पंचकर्म सेंटरच्या मालकीनीस अटक करण्यात आली आहे.
ज्योती अरूण धिवार (वय 34, रा. रामटेकडी,हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा झेंडे यांना पोलीस नाईक सचिन कदम यांच्याकडून हडपसर येथील समृद्धी आयुर्वेदिक पंचकर्म येथे थेरपीस्ट महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो अशी माहिती मिळाली.

 

त्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे व अधिकारी, कर्मचारी तसेच हडपसर पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांनी संयक्त कारवाई करून हडपसर येथील समृद्धी  आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये चालणा-या वेश्याव्यवसायाची खातरजमा करून तेथे छापा टाकला.

 

या छाप्यादरम्यान 3 सज्ञान मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावणारी  पंचकर्म सेंटरची मालकीनीला पोलिसांनी अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीसांनी कारवाईदरम्यान 4 हजारांची रोकड, मोबाईल फोन, फ्लॅटच्या अॅग्रीमेंटची झेरॉक्स कॉपी, आधारकार्ड इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यातील पिडीत मुलींना रेस्क्यु फाऊंडेशन महमदवाडी येथे संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.