Sangvi : संगिता जोगदंड याची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज – नवी सांगवीतील महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत ( Sangvi ) कामगार पुरस्कार प्राप्त संगिता जोगदंड यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती पत्र दिले.

सामाजिक काम करत असताना सामाजिक क्षेत्रात मान  मिळतोचच असे नाही. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. पण आपण आपले सामाजिक  कार्य कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता चालू ठेवणे हेच आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे.

Hinjawadi : युट्युबवरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील या आमिषाने सव्वादोन लाखांची फसवणूक

समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याच उदात्य भावनेतून आपण काम केले पाहिजे. याच निस्वार्थीपणे केलेल्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांने आम्हा दोघांना पती-पत्नी गुणवंत कामगार पुरस्कार देऊन राज्यातील दुसरे तर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील पहिले पती-पत्नी म्हणून गुणवंत कामगार पुरस्कारार्थी म्हणून  होण्याचा मान मिळाला.

याचेच फलित म्हणून आज मला विशेष कार्यकारी अधिकारी( Sangvi ) म्हणून नियुक्त करण्यात आले, असे जोगदंड म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.