Sangvi : अल्पवयीन मुलाकडून तीन वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलाने साडे तीन वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगवी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी (दि.21) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित चिमुकल्याच्या आईने फिर्याद दिली असून संशयित 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकला आणि ताब्यात घेतलेला मुलगा एकाच परिसरात राहतात. 3 जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास पीडित चिमुकला अंगणात झोपाळ्यावर बसला होता. त्यावेळी मुलगा त्याठिकाणी आला. त्याने बालकासोबत अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार आईला समजला असता सोमवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.