Sangavi : देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासाह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत (Sangavi ) काडतुसासह तरुणाला जुनी सांगवी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) जुनी सांगवी येथील विसर्जन घाटावरील रस्त्यावर करण्यात आली आहे.

निरज कुमार उपेंद्र सिंग (वय 25 रा.पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव असून पोलीस हवालदार प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला विसर्जन घाट रस्त्यावरून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत (Sangavi ) काडतुस असे 20 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

Kelgaon : वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक, दोन महिलांची सुटका

आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.