Pune : नाटक, चित्रपट केवळ कला प्रकार नसून संपूर्ण व्यासपीठ – सौरभ शुक्ला

एमपीसी न्यूज – नाटक किंवा चित्रपट हे केवळ एकल कलाप्रकार (Pune) नसून अनेक कलांचे मिळून साकारणारे एक संपूर्ण व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते, पटकथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांनी केले.

पुण्यातील दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या चौथ्या दोन दिवसीय डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले.

त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यगुरू पद्मश्री वामन केंद्रे आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका मोनिका सिंग, पद्मश्री पं. रामदयाल शर्मा, शाहीर सुरेश कुमार वैराळवर, सलीम आरिफ, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवी तोमर, युवराज शाह आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर ‘सौरभ शुक्ला : एक सुगंधित प्रवाह’ हा कॉफी टेबल टॉकचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सलीम आरिफ यांनी (Pune) शुक्ला यांच्याशी संवाद साधला.

शुक्ला यांचा अभिनेता, लेखक म्हणून आजवरचा प्रवास या दरम्यान उपस्थितांसमोर उलगडला. शुक्ला पुढे म्हणाले की, नाटक, चित्रपटासारखी माध्यमे ही अनेक कलांचे सौंदर्यपूर्ण संपूर्ण असे व्यासपीठ आहेत. या कलाप्रकारात अनेक कला लयीमध्ये एकत्र येतात, हीच लयबद्धता त्यांचे रुपडे आणखी देखणे करते. एका सिम्फनीसारखे ती या कलाप्रकाराला बांधून ठेवते.”

आई-वडील कलाप्रेमी असल्याने मी लहानपणी महिन्याला किमान दहा चित्रपट पहायचो. जेव्हा मी अभिनयाचे क्षेत्र निवडले तेव्हा हे काय करतोय किंवा करू नको असा विरोध घरातून झाला नाही. जेव्हा नाटकात काम करायला लागलो तेव्हा नाटकाची भाषा मला समजायला अवघड जायची.

किमान स्वत:ला कळावे, या हेतूने पुढे मी नाटक लिहायला लागलो आणि आज ते माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग असल्याचे सांगत शुक्ला यांनी आपला लेखक म्हणून प्रवास कसा सुरु झाला याबद्दल सांगितले. भारतात प्रत्येक मुलाला एकत्र क्रिकेटर बनायचे असते नाहीतर अभिनेता. मी सुरुवातील क्रिकेट खेळायचो पण मैदानावर खूप पळायला लागायचे, आपल्याकडून काही हे होणार नाही हे लक्षात आल्यावर मी अभिनयाकडे वळलो असे शुक्ला यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

Ravet : विमान तिकीटांच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक

अनेकदा लेखकांना अभिनेत्याने डायलॉग बदलले की राग येतो, मी लिहिलेले अभिनेत्याने बदललं तरी मला ते चालत असे सांगत शुक्ला पुढे म्हणाले, “लेखकांना असे वाटते की त्यांच्या शब्दांत अर्थ लपलेले असतात. पण तसे असते तर अभिनेत्याची गरजच भासली नसती. लेखक जे लिहितो त्याची पार्श्वभूमी आणि अभिनेत्याची पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक वेळी लेखकाला अभिप्रेत अर्थ अभिनेत्याला समजला आहे, हे गृहीत धरता कामा नये.

तो अर्थ समजविण्याचा आणखी प्रयत्न करणे आवश्यक असते.” जॉली एलएलबी या चित्रपटात मी केलेल्या अभिनयात ही कॅरेक्टरची पार्श्वभूमी आणि गरज लक्षात घेत केलेले काम म्हणूनच प्रेक्षकांना भावले, असेही शुक्ला यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.