Ravet : विमान तिकीटांच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सिंगापूर टुरचे विमान (Ravet ) तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 17 मे रोजी फोनवरून करण्यात आली आहे.

या प्रकरणी सुशांत सुर्यकांत जाधव (वय 33, रा.रावेत) यांनी रावेत पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (दि.24) ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून साई टुर्स हॉलीडेज कंपनीचे संचालक (शहादरा, दिल्ली) व शैलेश बिडवे याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maharashtra : राज्यात लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने सिंगापूर टुरचे विमान तिकीट बुकींगसाठी बँक अकाऊंटवर 50 (Ravet ) हजार रुपये घेतले. मात्र, आजपर्यंत विमानाचे तिकीट दिले नाही. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.