Thergaon : फौजी असल्याचे सांगत घर भाड्याने घेण्याचा बहाणा करून नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – फौजी असल्याचे (Thergaon) सांगून थेरगाव येथील एका नागरिकाला भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबर 2023 रोजी दत्तनगर, थेरगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी मृणाल महादेव गुरव (वय 48 रा.थेरगाव) यांनी शुक्रवारी (दि.24) फिर्याद दिली आहे. यावरून आशिषकुमार पहारी नावाच्या बँक खाते धारकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet : विमान तिकीटांच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोनवरून संपर्क साधला. यावेळी त्याने तो भारतीय सैन्यात असून सध्या जम्मू काश्मीरमध्ये पोस्टींग असल्याचे सांगितले.

तसेच त्याची पुणे येथे बदली झाली असून भाड्याने घर शोधत असल्याचे सांगितले. यासाठी आरोपीने फिर्यादीचा विश्वास (Thergaon) संपादन केला. यावेळी त्याने फिर्यादीचा गुगल पे कोड मागितला व एक रुपया पाठवून विश्वास संपादन केला.

त्यानंतर बँकेची व इतर माहिती घेवून फिर्यादीच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये काढून घेतले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.