Kasarwadi : उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची मागणी

एमपीसी न्यूज – कासारवाडीतील जमशेठजी टाटा उड्डाणपूल (Kasarwadi) नाशिक फाटयाची देखभाल व दुरुस्ती करण्याची मागणी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलने केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा येथील जमशेठजी टाटा उड्डाणपुलाच्या भिंतींवर नैसर्गिकरित्या वड, पिंपळ या झाडाची आणि त्यांच्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.

Thergaon : फौजी असल्याचे सांगत घर भाड्याने घेण्याचा बहाणा करून नागरिकाची फसवणूक

वेळोवेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाऊल उचलले जात (Kasarwadi) नाहीत. भविष्यात त्यामुळे पुलाला तडे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.