Kelgaon : वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक, दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसायप्रकरणी (Kelgaon) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एकाटा अटक केली असून दोन पीडितांची सुटका केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) केळगाव, आळंदी देवाची येथे घडली आहे.

बसवराज सुबन्ना बिरादार (वय 36, रा.केळगाव, आळंदी) असे अटक आरोपीचे नाव असून आरोपीवर अनैतिक व्यापार अधिनियम 1956 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता. (Kelgaon) पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकून दोन पिडीतांची सुटका केली.

Kasarwadi : उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची मागणी

यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून 7 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.