Shirish Kanekar : ‘फिल्मबाजी’ गाजवाणारे ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रातील प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 

शिरीष कणेकर यांचा सिनेमा, क्रिकेट या विषयांवर हातखंडा होता. विविध वृत्तपत्रात त्यांचे लेख गाजले होते. फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांचे कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन हे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत.

Maval : विम्याचे पैसे आल्याचे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाखांची फसवणूक

इंडियन एक्सप्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.

आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी महत्त्वाच्या समस्यांवर बोट ठेवले. त्यांची लिखानाची ही शैली प्रसिद्ध होती. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे नाव नेहमी आदराने आणि आवर्जून घेतले जात. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.