Pune : आपले पुणे मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत विधी संघर्षीत सहा बालकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – आपले पुणे (Pune) मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत निरीक्षण गृहातील एक विधी संघर्षीत बालक व पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड ह्यांच्या संकल्पनेतून दिशा उपक्रम अंतर्गत सहा बालकांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता.

Bhosari : भोसरीत टोळक्याची दहशत; वाहने अडवून खंडणीची मागणी

आपले पुणे मॅरेथॉन यांनी 23 जुलै 2023 रोजी बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या स्पर्धेतमध्ये या बालकांचा सहभाग करून एक वेगळा संदेश दिला.

परिस्थितीमुळे कमी वयातील मुले अर्धवट शिक्षण सोडून वाईट दिशेने भरकटू लागले आहे. त्यात वाईट संगतीमुळे ही मुले गुन्हेगारी क्षेत्रात आकर्षित होत आहे. अशा मुलांना गुन्हेगारी मार्गाला जाण्यापासून परावृत करीत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या विधी संघर्षित बालकांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले आहे या स्पर्धेमध्ये ही बालके उत्तमरीत्या धावले आहे.

या उपक्रमासाठी संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन व सुषमा कोप्पीकर यांनी पुढाकार व जबाबदारी घेऊन योग्य ते नियोजन करून या मुलांना स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला.

या उपक्रमासाठी विशेष सहकार्य प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट मानसी परदेशी व ज्युवीनाईल जस्टिस बोर्ड टीम, पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक केंद्र निरिक्षण गृहाचे अधिक्षक श्री दत्तात्रय कुटे तसेच संस्थेतील कर्मचारी व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मा पोलिस आयुक्त व दिशा उपक्रम राबवित असलेले विशेष बाल पोलिस पथक यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.