Alandi : आळंदी ग्रामीण रुग्णालयात वारकरी संस्था प्रमुखांना डोळे लागण संदर्भात मार्गदर्शन

आजची रुग्ण संख्या 1482

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) शहरात दि.23 रोजी आज विविध संस्थेमध्ये मुलांची डोळे लागण तपासणी करण्यात आली. बाधित रुग्णांना औषधे देण्यात आली. आजची डोळे लागण असलेली रुग्ण संख्या 1482 इतकी  आहे.

Pune : आपले पुणे मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत सहा बालकांचा सहभाग

काल आणि आज मिळून शहर व परिसरातील संस्थेतील वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची जागेवर जाऊन तपासणी करून उपचार करण्यात आले. सकाळी ग्रामीण रुग्णालयात वारकरी संस्था प्रमुखांना डोळे लागण साथ रोग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी तपासणी बाबतही बैठक घेण्यात आली. याबाबत माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी दिली.

 

सोमवार ते शनिवार एकूण रुग्ण संख्या 4921 असून आजची रुग्ण संख्या 1482 इतकी आहे.या 7 दिवसां मध्ये आळंदी (Alandi) व परिसरातील  एकूण रुग्ण संख्या 6403 इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.