Lonavala : आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज – बोरघाटात (Lonavala) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ आज (रविवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बोरघाटात (Lonavala) अमृतांजन पॉईंट व आडोशी बोगदा या दरम्यान किलोमीटर 41 जवळ ही दरड कोसळली आहे. दरड कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने जीवितहानी टळली. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Chakan : खेडमधील दरडप्रवण व पूरप्रवण स्थितीचा आढावा तयारीसाठी मॉक ड्रिल ; 2 गावे मृत्युच्या दाढेत

दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री 22.35 च्या सुमारास पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवे वर मौजे आडोशी गावचे हद्दीत km. No.41/00 जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. सदरचा मातीचा लगदा हा आय आर बी चे जेसीपी, डंपर च्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः 20ते 25 डंपर डबर रोड मध्ये पडलेला आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित असून लगदा काढण्याचे काम चालू आहे.

लोणावळा (Lonavala) – खंडाळा परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोरघाटातील दरड प्रवण क्षेत्रात धोका वाढला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.