Pune Railway : गत आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभाग मालामाल; वर्षभरात कमावला 1797 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – मागील आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने चांगली कामगिरी केली आहे. सन 2023-2024 या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने एक हजार 797 कोटी 49 लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. हे उत्पन्न सन 2022-2023 च्या तुलनेत 15.8 टक्के तर निर्धारित उद्दिष्टापेक्षा 5.2 टक्के अधिक आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने 55 लाख 78 हजार प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून एक हजार 210 कोटी 82 लाख रुपयांचा महसूल रेल्वेला (Pune Railway) मिळाला आहे. हे उत्पन्न सन 2022-2023 च्या तुलनेत 18.1 टक्क्यांनी अधिक तर निर्धारित उद्दिष्टापेक्षा 8.1 टक्के अधिक आहे.

मालवाहतुकीतून देखील 11 टक्क्यांनी अधिक उत्पन्न मिळवत पुणे रेल्वे विभागाने 447 कोटी 47 लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला. विविध महसुली प्राप्ती मधून 20 कोटी 42 लाख रुपये मिळवले आहेत.

Pimpri-Chinchwad : बांधकाम साईटवर सज्जा पडून महिलेचा मृत्यू

तिकीट तपासणी मोहीम कायम राबवली जात आहे. त्यात फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जात आहे. सरत्या वर्षात 27 कोटी 84 लाख रुपये अशा फुकट्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम म्हणून पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway) जमा केले आहेत. ही वाढ निर्धारित उद्दिष्टापेक्षा 23.7 टक्के आहे.पार्सल मधून 29 कोटी 56 लाख रुपये तर इतर कोचिंग मधून 118 कोटी 78 लाखांचा महसूल मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.