Alandi : आळंदी ग्रामीण रुग्णालयात केंद्र शासन महत्वकांक्षी आयुष्यमानभव मोहिमेचे उदघाटन

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) मधील आळंदी ग्रामीण रुग्णालयात केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमानभव मोहीम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यँत राबवली जाणार आहे. त्याचे आज दि.13 रोजी ग्रामीण रुग्णालयात उदघाटन झाले.या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत म्हणण्यात आले.

Pune : ज्योती जाधव यांची भाजपा उत्तर पुणे ग्रामीण कार्यतकारीणीमध्ये निवड

तद्नंतर ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी‘आयुष्मान भव’ मोहिमे दरम्यान मिळणाऱ्या आरोग्य सेवा, आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम व 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी तसेच संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग,नेत्र रोग तपासणी, स्त्री ,पुरुष विविध रोग इ.बाबत माहिती दिली.

या कार्यक्रमा दरम्यान हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर, पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी पदी प्रकाश कुऱ्हाडे(अजित पवार गट),आळंदी शिवसेना शहराध्यक्ष पदी राहुल चव्हाण(शिंदे गट) यांची नवनियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सन्मान येथे करण्यात आला. प्रकाश कुऱ्हाडे यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती बद्दल यावेळी येथे माहिती दिली.

या ग्रामीण रुग्णालयात आधुनिक , नवीन सोई सुविधा मिळाव्यात
यासाठी पाठपुरावा आमदारां कडे करणार आहोत असे ही त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचा प्रगतीचा आलेख यावेळी त्यांनी सांगितला.संकेत वाघमारे यांनी सुध्दा यावेळी ग्रामीण रुग्णालया बाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या रुग्णालयातील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे नसरुद्दीन शेख यांनी हिंदीतून यावेळी चारोळी सादर केली.

आज यहां पर आयुष्यमानभव का हुआ है उदघाटन
चलो हम सब मिलकर करते है ,रोगो का उच्चाटन

हर घर पुहॅच रहा है आयुष्यमानभव का नारा हमारा
आयुष्यमानभव से तंदुरुस्त होने जा रहा है भारत हमारा

इस लिए अब अलर्ट मोडपर है
ग्रामीण रुग्णालय का स्टाफ हमारा

रुग्णसेवा में ही है ईश्वर का दर्शन
इसलीए होता है संचालको का मार्गदर्शन

पत्रकार भी निभाते है हमरा हौसला बुलंद करने की अहम भूमिका
तभी तो बढ रही है इस दिन ब दिन रुग्णालय की क्रमिका

या हिंदी चारोळीला मान्यवर व उपस्थित नागरिकांनी चांगली दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी अवयव दान प्रतिज्ञा झाली. यावेळी पांडुरंग गावडे ,सतीश चोरडिया,बिडकर,डॉ.शुभांगी नरवाडे ,ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वर्ग व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.