Alandi : भाजी विक्रेते पुन्हा आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर

एमपीसी न्यूज : आळंदी पोलिस स्टेशन ते आळंदी ग्रामीण (Alandi) रुग्णालयाच्या मुख्य गेटपर्यंत भाजी विक्रेते, हातगाडीवाले व इतर विक्रेते यांनी दुतर्फा आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर आज दि.11 रोजी मोठ्या प्रमाणात दुकाने लावली होती.

तेथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकाने लागल्याने रस्ता अरुंद झाला होता. तेथील रस्त्यावर वाहतूक कोंडी काही प्रमाणात दिसून येत होती. मार्च 2023 मध्ये आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय पर्यंतच्या प्रवासास तेथील रहदारीमुळे अडथळा निर्माण झाला. परिणामी रूग्णावरील उपचारासाठी विलंब झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पोहचण्या अगोदरच एका 21 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला होता.

Pune : नरेंद्र मोदी समजतात तेवढी लोकसभा निवडणूक सोपी नाही – पृथ्वीराज चव्हाण

याची नोंद घेत तत्कालीन तहसीलदार यांनी आळंदी पोलीस स्टेशन ते ग्रामीण (Alandi) रुग्णालय या रस्त्यावर भाजी विक्रेते व इतर विक्रेते यांनी बसू नये असा निर्णय पालिका कार्यालयात एका प्रशासकीय  बैठकीत घेतला होता. परंतु, प्रशासनाचा नियम डावलून हे भाजीविक्रेते, हातगाडीवाले व विविध विक्रेते बसल्याचे वेळोवेळी दिसून येतात. यासाठी पालिकेने त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी. असे तेथील स्थानिक नागरिकांनी यावेळी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.