Pune : चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे स्टेशन (Pune )येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये एका कामासाठी आले होते.

त्यावेळी तेथील डी.एड, बी.एडच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यात याव्या, यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाचा ताफा अडवून आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Pune : नरेंद्र मोदी समजतात तेवढी लोकसभा निवडणूक सोपी नाही – पृथ्वीराज चव्हाण

या घटनेमुळे बराच काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. पिंपरीच्या शाई फेकीनंतर चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मागील वर्षभराच्या कालावधीत भाजपचे नेते(Pune ) आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर चंद्रकांत पाटील हे ज्या ठिकाणी कार्यक्रमास जातील.

त्या ठिकाणी आणि त्यांच्या ताफ्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.