Pune : नरेंद्र मोदी समजतात तेवढी लोकसभा निवडणूक सोपी नाही – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी समजतात तेवढी (Pune) आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होऊ शकतो, हे पोटनिवडणुकीत दिसून आले.

‘इंडिया आघाडी’तील वाटाघाटी अतिशय सकारात्मक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक जेवढी सोपी समजतात, तेवढी ती नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते, हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आले. भाजपचा पराभव होऊ शकतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पुण्यात काँग्रेसकडे 20 जण इच्छुक आहेत.

Pune : बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविताना अजित पवार यांची भूमिका निर्णायक

नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील वाडेश्वर कट्ट्यावर प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज चव्हाण, ‘निर्भय बनो’ आंदोलनाचे प्रमुख विश्वंभर चौधरी, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. कट्ट्याच्या सुरुवातीलाच आमदार अपात्रततेच्या (Pune) सुनावणीबाबत चर्चा रंगली होती. या वेळी चव्हाण म्हणाले, ‘घटनेच्या शेड्युल दहानुसार निर्णय दिला गेला, तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील आणि दिल्लीवरून निकाल आला, तर होणारा निर्णय हा सगळ्यांना माहितीच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.