Pune : बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविताना अजित पवार यांची भूमिका निर्णायक

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune)बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघात उमेदवार ठरविताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

शिवसेनेचा निकाल लागला असून खरी शिवसेना शिंदेचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गट मोठ्या धक्क्यात आहे. त्यातच आता लोकसभेच्या निवडणुकीची तयारी देखील सर्वच पक्षांकडून सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळ (Pune)या तिन्ही लोकसभा मतदार संघावर सर्वच पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यात अजित पवार गटाचे याकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बारामतीसाठी अजित पवार गटाकडून घरण्याबाहेरचा उमेदवार देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Bhosari : कामाची विचारणा केल्यावरून एकास मारहाण

तसेच अजित पवार गट पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा घेण्याची तयारी करीत असून मागच्या निवडणुकीचा वाचपा काढण्याचा त्यांचा मानस आहे. ते शिरूर लोकसभा ही शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामती मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची बारामती मतदारसंघात चर्चा सुरू होती. आता अचानकपणे भरणे यांचे नाव पुढे आले आहे. शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच अशी खूणगाठ अजित पवार यांनी बांधली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी शिरूरमध्ये जोरदार तयारी सुरू केली होती.

मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर, मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची चिन्हे आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.