Chinchwad : सामाजिक कार्यकर्ते भगवानराव मुळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड शाहुनगर येथील (Chinchwad) साई मंदिर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते भगवानराव (नाना ) तुकाराम मुळे (वय 63) यांचे आज (गुरुवारी) दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.

भगवानराव मुळे हे ट्रीनेटी कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. ते नाना या टोपण नावाने परिचित होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक, धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. शाहुनगर येथील साई मंदिर उभारण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. साई मंदिर देवस्थानच्या माध्यमातून शाहूनगर, संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत होते. विविध विधायक उपक्रम घेण्यात त्यांचा हिरारीने सहभाग होता. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासह बैठकीला उपस्थित राहणं टाळलं

भगवानराव मुळे यांचे पार्थिव उद्या शुक्रवारी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत शाहुनगर चिंचवड येथील साई मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये सकाळी 10.30 वाजता (Chinchwad) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.