Pune : महायुतीचा रविवारी संयुक्त मेळावा

एमपीसी न्यूज – भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (Pune)आरपीआय (ए) शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा रविवारी (तारीख 14) म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार(Pune) राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार हा मेळावा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे.

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासह बैठकीला उपस्थित राहणं टाळलं

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.
लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे, मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश आहे.

यावेळी पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे, समन्वयक महायुती, पुणे संदीप खर्डेकर, आरपीआयचे (ए) परशुराम वाडेकर, ऍड. मंदार जोशी, संजय सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सुरेश घुले, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, संजय मशीलकर, किरण साळी, शिवसंग्राम संघटनेचे भरत लगड उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.