Bhosari : कामाची विचारणा केल्यावरून एकास मारहाण

एमपीसी न्यूज – कामाची विचारणा (Bhosari) केल्याने दोन कामगारांनी एकास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी एमआयडीसी भोसरी येथील एशियन कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयासमोर घडली.

अमित जगताप (वय 25), प्रशांत जगताप (वय 50, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र रेवाप्पा कांबळे (वय 51, रा. धानोरी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : आपच्या माजी शहराध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी कामातील पाईपच्या लांबी (Bhosari) बाबत आरोपींना विचारणा केली. त्यावरून अमित याने फिर्यादीस ‘तू मला शहाणपण शिकवू नको. तुला बघून घेतो. तू येथून कोठेही जाऊ नको तुला दाखवतो’, अशी धमकी दिली. प्रशांत जगताप याने फिर्यादीस ‘शिवीगाळ का केली’ असे म्हणून मारहाण केली. तर अमितने लाकडी काठीने कांबळे यांना मारहाण करून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.