Pimpri : आपच्या माजी शहराध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीचे (‘आप’) पक्षाचे माजी शहर अध्यक्ष अनुप शर्मा (Pimpri)यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्याचबरोबर उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील, (Pimpri)सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा माजी अध्यक्ष वहाब शेख तसेच विष्णु पाटील, दिपक श्रीवास्तव, सतिश नायर, सिमा यादव, मेमुना शेख, सद्दाम पठाण, रवी कृष्ण मोरे, जावेद शेख, भैय्यासाहेब कांबळे, गणेश कांबळे, मुकेश जाधव, अजय गायकवाड, फिलिप मकासरे, रामसिंग यादव आदींचा शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

Talegaon :100 व्या नाट्यसंमेलनाच्या सांगता समारंभात तळेगावच्या कलाकारांचा गौरव

त्यांचे स्वागत आमदार धंगेकर यांनी केले. शहराध्यक्ष कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष शामला सोनवणे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.

जातीयवादी आणि धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेसची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळेच विचारवंतांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या ‘आप’ मधून सुजाण युवक काँग्रेस पक्षात प्रवेश करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले.

त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या धर्माचा मान, सन्मान राखणे हा आमचा धर्म आहे. हिंदू, मुस्लिम या देशात एकजुटीने राहत आहेत. आजचा युवक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये येत आहे. ‘आप’ मधून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांचे मी स्वागत करतो असे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.