Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासह बैठकीला उपस्थित राहणं टाळलं

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Pune)यांच्यासह बैठकीला उपस्थित राहणं टाळलं. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे 47 वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेपूर्वी नियामक मंडळाची बैठक झाली.

या बैठकीच्या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट अध्यक्ष शरद पवार, (Pune)राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित आहेत. या बैठकीला अजित पवार येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण, ऐनवेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीला येण टाळल आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खमंग चर्चांना उत आला आहे.

Talegaon :100 व्या नाट्यसंमेलनाच्या सांगता समारंभात तळेगावच्या कलाकारांचा गौरव

सहा महिन्यापुर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्या घटनेनंतर आज अखेरपर्यंत ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार असतील. त्या ठिकाणी अजित पवार हे व्यासपीठावर जाण्याचे टाळत आहे.

पण, आजवर वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथील कार्यक्रम आणि बैठकांना अजित पवारांनी हजेरी लावली आहे. राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत येणे टाळलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.